Maharashtra BJP 160 Candidate: विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी जोरदार तयार केलीय. महायुतीचं जागावाटप जवळपास पूर्ण झालंय. भाजपनं त्यांचे उमेदवारही निश्चित केलेत.  दिल्लीत केंद्रीय नेत्यांसोबतच्या बैठकीत  उमेदरावांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच या बैठकीत निवडणुकीतल्या रणनितीवरही चर्चा होतेय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा आता कधीही होऊ शकते.  महायुतीत कोणता पक्ष किती जागा लढवणार याची चर्चा सुरू असतानाच भाजपचे उमेदवार ठरल्याची माहिती आहे. भाजप 150 ते 160 जागांवर उमेदवार देण्याची शक्यता आहे. भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीत उमेदवारांची यादी जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. बंद लिफाफ्यात ही यादी हायकंमाडकडे  पाठवण्यात आलीय. आता हा बंद लिफाफा उघडल्यानंतरच उमेदवार ठरणार आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची निवड, सहयोगी पक्षांसोबतचं जागावाटप आणि विरोधकांसाठीची रणनीतीही ठरवली जाणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. 


टोलमाफीच्या निर्णयानंतर आणखी मोठा निर्णय! एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी


शिवसेना, राष्ट्रवादीला किती जागा?


महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेनं शंभराहून अधिक जागांची मागणी केलीय. तर अजित पवारांच्या एनसीपीनं साठपेक्षा जास्त जागांची मागणी केलीय. मात्र,महायुतीत शिंदे शिवसेनेला 90 ते 95 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 40 ते 45 जागा मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागावाटपासह इतर काही महत्त्वाच्या घोषणा यावेळी होण्याची शक्यता आहे.


7 आमदारांची नावे राज्यपालांकडे पाठवली


राज्यपाल कोट्यातून होणाऱ्या आमदारकीसाठी ज्या 12 लोकांची नियुक्ती रखडली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील 5 वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या प्रश्नाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यपाल नियुक्त 7 आमदारांच्या नावांची यादी राज्यपालाकंडे पाठवण्यात आली आहे. महायुतीने ही यादी पाठवल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांच्या नावांची यादी जवळपास निश्चित झाली आहे. महायुतीकडून राज्यपालांना सात नावांची शिफारस करण्यात आली आहे.  भाजपकडून 3 तर शिंदे, पवार गटाची प्रत्येकी 2 नावं या यादीत असल्याचे समजते.  राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीविरोधात ठाकरे गटाचे सुनील मोदी यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे.  या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून 23 ऑक्टोबर पर्यंत उच्च न्यायालय देणार निकाल देणार आहे.