प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. लग्न म्हंटलं की डीजे आलाच, मात्र हा डीजे तुम्हाला कायमचा बहिरा करू शकतो. नागपुरात (Nagpur) डीजेमुळे एका तरूणाचे दोन्ही कान निकामी झालेत आहेत. अत्यंत उच्च आवाजात DJ वर गाणी लावली जातात. या आवजामुळे छातीत धड धड वाढते मात्र, आता थेट कायमचा बहिरेपणा देखील येवू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डीजेच्या मोठ्या आवाजामुळे  भंडारा जिल्ह्यातील मोहाडीतल्या नितीन लिल्हारे यांना कायमचं बहिरेपणा आले आहे. नितीन यांचे दोन्ही कान निकामी झाले आहेत. डीजेच्या आवाजमुळे हे सगळं घडल आहे.  नितीन यांच्या चुलत भावाचं लग्न होतं. डीजेच्या तालावर नवरदेवाची वरात निघाली होती. नितीन देखील डीजेसमोर बेभान होऊन नाचत होते. मात्र, लग्नसोहळा संपला तरी त्यांच्या कानात डीजेचाच आवाज घुमतच होता. कोण काय बोलतंय हे ऐकूही येईना. नितीन यांनी लागलीच डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी त्यांचे दोन्ही कान तपासले, तेव्हा डीजेचा त्यांच्या दोन्ही कानांवर परिणाम झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. 


डीजेचा आवाज 140 डेसिबलपेक्षा अधिक असतो. डीजेमुळे अनेकांना हार्ट अटॅक आल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष करून लहान मुलं आणि वयोवृद्धांसाठी डीजे अत्यंत घातक असल्याचं डॉक्टर्स सांगतात. मात्र, तरीही त्याकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे. 


नितीन लिल्हारे, डीजेच्या दुष्परिणामाचं हे एक प्राथमिक उदाहरण झालं. नितीन यांच्यासारखे अनेक लोक आहेत ज्यांना डीजेमुळे कानांचा, हृदयविकाराचा त्रास होतोय. त्यामुळे डीजेसमोर बेभान होऊन नाचण्यापूर्वी दहावेळा विचार करा. हा क्षणिक आनंद तुम्हाला आयुष्यभरासाठी बहिरेपणा देऊ शकतो.


डीजेनं घेतला नवरदेवाचा बळी?


बिहारमधल्या सितामढी इथला इथं सोनबरसातील इंदरवा गावात लग्नसोहळा सुरू असताना अचानक नवरदेवाला हार्ट अटॅक आला आणि आनंदाच्या क्षणाला दु:खाचं गालबोट लागलं. वधू-वरांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातली आणि त्यानंतर अचानक नवरदेव सुरेंद्र बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डीजेमुळे सुरेंद्रचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार लग्नसोहळ्यात जोरजोरात डीजे सुरू होता. डीजेचा आवाज कमी करा अशी विनंतीही सुरेंद्रनं वारंवार केली. मात्र. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि अखेर सुरेंद्रची प्राणज्योत मालवली.