चंद्रपूर : आकाशातून आगीचे लोळ दिसल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रात कुतूहल निर्माण झाले आहे. राज्याच्या आकाशात सर्वांनी केवळ आगीचे लोळ अनुभवले. मात्र या घटनेचा वस्तू स्वरूपातला भाग चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाही तालुक्यात लाडबोरीमध्ये कोसळला आहे. मोठा आवाज करत ही रिंगसदृश्य वस्तू जमिनीवर कोसळली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिकांनी ही रिंग सिंदेवाही पोलीस स्टेशनमध्ये नेली.  ही रिंग अत्यंत जड आहे. मिश्र धातूंनी बनलेली ही अवजड रिंग नक्की कशाचा भाग आहे. हे मात्र अजुन कोडंच आहे. प्रशासन, अंतराळ संशोधन संस्था या सर्वांनी याचं परीक्षण करण्याचं मत व्यक्त होत आहे.