संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंविरोधात अॅट्रोसिटी गुन्हा
कोरेगाव भीमाच्या विजय दिनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी राज्यभरात तीव्र पडसाद पडत असून या प्रकरणी शिव प्रतिष्ठानचे `संभाजी भिडे यांचे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड : कोरेगाव भीमाच्या विजय दिनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी राज्यभरात तीव्र पडसाद पडत असून या प्रकरणी शिव प्रतिष्ठानचे 'संभाजी भिडे यांचे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिंपरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले. दंगल भडकविण्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड विधान ३९५, ३०७ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई पुणे महामार्ग आंदोलनकर्त्यांना रस्ता रोको केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी पिंपरी पोलिसांनी संभाजी भिडे आणि एकबोटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे.