मुंबई : दहशतवाद विरोधी पथकानं जेरबंद केलेला दहशतवादी फैझल मीर्झाच्या निशाण्यावर देश पातळीवरील एक बडा नेता होता, तसेच त्यानं मुंबईतील काही महत्वाच्या ठिकाणांची टेहाळणी केल्याचं चौकशीत निष्पन्न झालं आहे. मिर्झा महाराष्ट्रातील महत्वाच्या ठिकाणांवर हल्ल्याच्या  तयारीत असल्याचं उघ़ड झालं आहे. तो इंडीयन मुजाहिद्दीनचा कुख्यात दहशतवादी आमिर रेझा खानच्या संपर्कात असल्याचही चौकशीत निष्पन्न झालं आहे. दहशतवाद विरोधी पथकानं रविवारी मिर्झा फैजलला जेरबंद केलं आहे. त्यानं पाकिस्तानात जावून बॉम्ब तयार करणे, शस्त्र चालवणे याचं प्रशिक्षण घेतल्याचं उघड झालंय. इतर आरोपींशी संगनमत करून अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, वर्दळीची ठिकाणं, अत्यावळश्यक सेवा या ठिकाणांवर दहशतवादी हल्ल्याचा कट आखला होता. त्याल २१ मेपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आलीय.