जळगाव : डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या संशयावरून दहशतवादी विरोधी पथकाने जळगाव जिल्ह्यातील साकळी येथील २८ वर्षीय वासुदेव सूर्यवंशी या युवकाला ताब्यात घेतल्यानं खळबळ उडाली आहे. पथकाने सुर्यवंशी याला ताब्यात घेताच तात्काळ एका वाहनाने घेवून गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पथकासोबत आलेल्या दुस-या वाहनातील पथकाने सूर्यवंशी यांच्या घरात बंद दरवाज्यात सुमारे अडीच ते तीन तास झाडाझडती घेतली. या कारवाईबाबत मात्र एटीएस पथकाने प्रचंड गोपनीयता बाळगली. अटकेतील तरुण जळगाव जिल्हातील मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की येथील मुळ रहिवासी असून तो मोटारसायकल गॅरेजचा व्यवसाय करतो.