नागपूर : अजूनही नागपूर गुन्हेगारीने धुमसत आहे. नागपूरच्या गुजर नगरात एका हत्या प्रकरणातल्या आरोपीच्या कुटुंबीयांच्या गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. यामध्ये एक स्कुटर, बुलेट आणि एका टेम्पोचं नुकसान झाले आहे. २९ जुलैच्या रात्री गुजर नगरमध्ये आनंद शिरपूरकर या तरुणाची हत्या करण्यात आली होती. 


उधारीच्या पैशाच्या वादातून ही हत्या झाली. याप्रकरणातल्या आरोपीच्या घरावर काही तरुणांनी दगडफेक केली आणि वाहनांची जाळपोळ केली. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर गुजर नगरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.