पिंपरी चिंचवड : एक धक्कादायक बातमी. काही दिसांपूर्वी विवाह बंधनात अडकलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ( Attack on Sonalee Kulkarni's father ) पुण्यातील निगडी येथे हा चाकू हल्ला करण्यात आले आहे. मात्र, या हल्लाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. (Attack on Marathi Actress Sonalee Kulkarni's father in Nigadi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर हल्ला झाल्याची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले. हा हल्ला  सोनाली कुलकर्णी हिच्या एका चाहत्याने  केल्याची प्राथमिक माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच सोनाली कुलकर्णी हिचे लग्न दुबईत झाले. त्यानंतर आज  निगडी प्राधिकारणातील सोनाली हिच्या घरी सकाळी साडे सातच्या सुमाराला चाहत्याने चाकूच्या सह्यायने हल्ला केला. सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी  (Manohar Kulkarni) किरकोळ जखमी झाले आहेत. हल्लेखोर  अजय शेटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.


 मनोहर कुलकर्णी यांच्या घरात एका व्यक्तीने जबरदस्तीने घरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिच्या वडिलांनी तीव्र विरोध केला. यावेळी सोनाली हिच्या चाहत्याने चाकू हल्ला करत वडिलांना जखमी केले आहे. या हल्ल्यात सोनाली हिचे वडील मनोहर कुलकर्णी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्या घराच्या खालच्या फ्लॅटमध्ये अनोळखी व्यक्ती घुसल्याची माहिती मनोहर कुलकर्णी यांना मिळाली.


त्यानंतर ते खालच्या फ्लॅटमध्ये गेले असता अजय शेटे या हल्लेखोराने त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर मनोहर कुलकर्णी यांनी निगडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने घरात घुसल्याचे तक्रारीत म्हंटले आहे, अशी माहिती निगडीचे पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिली