नांदेड : येथील आमदार डी पी सावंत यांना संतप्त ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न केला गेला. तर स्विय्य सहाय्यकाला मारहाण करण्यात आली. आमदार सावंत हे एका कामाच्या उद्घाटनासाठी आपल्या मतदार संघातील तळनी येथे गेले होते. यावेळी तळणी येथे मात्र ग्रामस्थानी त्यांना अडवले आणि जाब विचारला. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थ संतप्त झालेत आणि त्यांनी प्रश्न विचारताच मध्ये स्विय्य सहायकांने हुज्जत घातली. त्यावेळी ग्रामस्थानी धक्काबुक्कीचा प्रयत्न केला.


दुष्काळाग्रस्त गावांमध्ये तळणी या गावचा समावेश का झाली नाही, असा प्रश्न ग्रामस्थानी उपस्थित केला.यावेळी त्यांचे स्विय्य सहायक तांदळे आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यात गावातील काही युवकांनी वादात ऊडी घेतली. स्विय्य सहाय्यक तांदळे याना या जामावाने मारहाण केली तर आमदार सावंत यांनाही धक्काबुक्की केली. याबाबत मात्र पोलीस ठाण्यात अद्याप कुठलीही तक्रार देण्यात आली नाही.