गडचिरोली : गडचिरोलीमध्ये एका पोलिसावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गडचिरोलीतील आरमोरी शहराजवळ शनिवारी रात्री एका वाहनाने पोलिसाला उडवल्याची घटना समोर आली आहे. निवडणूक आणि नियमित नाकाबंदी दरम्यान वाहनाने पोलिसाला उडवण्यात आले. केवलराम येलुरे असे गाडीने उडवून हत्या करण्यात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. आरमोरी शहराजवळ रात्री दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केवलराम येलुरे (४०) हे आरमोरी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. गडचिरोलीच्या दिशेने स्विफ्ट डिझायर गाडी जात असताना या गाडीने केवलराम यांच्यावर हल्ला चढवण्यात आला. त्यानंतर गाडीतील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही गडचिरोली येथे राहणारे होते. हत्येनंतर घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाले. केवलराम येलुरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
करण्यात येणार आहेत.


गडचिरोलीत राहणाऱ्या हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच याप्रकरणी दोघांची अधिक चौकशी सुरू असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. पोलिसांवर हल्ला होण्याची ही विदर्भातील पाचवी घटना आहे. यापूर्वीही विदर्भात पोलिसांवर हल्ला झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.