अहमदनगर जिल्ह्यात प्राणघातक हल्ला आणि गोळीबार
या हल्ल्यात माणिकदौंडीगावचे माजी सरपंच संपत गायकवाड हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी कृषीउत्पन्न बाजार समितीच्या संचालकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात माणिकदौंडीगावचे माजी सरपंच संपत गायकवाड हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.
दोघांवरही कुर्हाडीने वार
पाथर्डी न्यायलयासमोर ही घटना घडली आहे. या दोघांवरही कुर्हाडीने वार करुन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. माणिकदौंडीचे रहिवाशी शंकर काळे यानं हा हल्ला केला आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याचं उघड झालं आहे, या बाबत पाथर्डी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विळद गावाजवळ महिलेवर गोळीबार
एका दुसऱ्या घटनेत, अहमदनगर जिल्ह्यातील विळद गावाजवळ गोळीबार झालाय. या गोळीबारात एक महिला जखमी झाली आहे. गोळीबारानंतर हल्लेखोरानं स्वताला गोळी मारुन आत्महत्या केली आहे. अमृतलाल पाल असं मृत व्यक्तीचं नाव आहे. एकतर्फी प्रेमातून हा गोळीबार झाल्याचं बोललं जातं आहे.