Crime News In Marathi:  कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीने पतीला जिवंत जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. कल्याण शहरात राहणाऱ्या 61 वर्षांच्या पतीला पेन्शनच्या पैशांसाठी आगीच्या हवाली करण्याचा कट एका महिलेने रचला होता. या प्रकरणी घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पीडित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण शहरातील हे प्रकरण आहे. 61 वर्षांच्या व्यक्तीचे त्याच्या पत्नीसोबत पेन्शनच्या पैशांवरुन वाद सुरू होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या मुलीचे दोन मित्र नेहमी घरी यायचे. हे तिच्या पतीला आवडले नाही. तसंच, यावरुन त्याने दोघींनाही सुनावले होते तसंच, दोन मित्रांना घरी येण्यास नकार दिला होता. यावरुन महिला नाराज झाली होती. 


पतीने मुलीच्या मित्रांना घरी येण्यास विरोध केल्यानंतर  महिलेने त्यांच्यासोबत मिळून भयानक हत्येचा कट रचला. तिने पतीच्या पेन्शनसाठी पतीच्या हत्येचा कट रचला. 8 डिसेंबरच्या रात्री तिने मुलीच्या दोन मित्रांना घरी बोलवले. त्यानंतर त्या दोघांनी महिलेच्या पतीवर ज्वलनशील पदार्थ टाकले आणि महिलेने आग लावली. त्यानंतर पीडितेने आरडा-ओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी येऊन पाहिले तेव्हा लगेचच येऊन आग विझवली आणि पीडित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. त्याचबरोबर या घटनेची माहिती पोलिसांना दिली. 


सूचना मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. पोलिसांनी महिलेसोबतच अन्य दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील दोन आरोपी हे पीडित व्यक्तीच्या मुलीचे मित्र आहेत. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये. 


पोलिसांनी पीडित व्यक्तीच्या जबाबानुसार तक्रार दाखल केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, त्याची पत्नी मासिक पेन्शन आणि दोन तरुण सतत घरी यायचे यावरुन तक्रार केल्यानंतर ती सतत भांडत होते. तसंच, गेल्या काही दिवसांपासून तो सतत पोलिसांना जीवाला धोका असल्याची तक्रार करत होता. पोलीस या प्रकरणी संपूर्ण तपास करत आहेत.