परिस्थिती पुढे हात टेकले, एसटी चालकाच्या मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न
एक धक्कादायक बातमी. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुढील शिक्षण घेता येत नव्हते. या नैराश्यातून एसटी चालकाच्या मुलाने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.
नाशिक : ST driver's son Attempted Suicide : एक धक्कादायक बातमी. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुढील शिक्षण घेता येत नव्हते. आपल्याला पुढील शिक्षण घेता येत नाही या नैराशात एसटी चालकाचा मुलगा होता. त्यानंतर या एसटी चालकाच्या मुलाने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला.
मालेगावात एसटी चालकाच्या मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अँनिमेशन डिप्लोमा करण्याची इच्छा असूनही घरच्या परिस्थितीमुळे ती पूर्ण करता येत नसल्याने नैरात्र्यातून एसटी चालकाच्या मुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना मालेगावमध्ये घडली.
गणेश शिंदे असे या तरुणाचे नाव आहे. गणेशचे वडील शिवदास शिंदे हे मालेगाव एसटी आगारात चालक आहेत. सध्या पुरेसे पैसे नसल्याने वडिलांनी त्याला थोडे दिवस थांबण्याचा सल्ला दिला. मात्र, घरी कोणी नसल्याचे पाहून गणेश याने काल दुपारच्या सुमारास घरात विष प्रशान करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर मालेगावच्या संकल्प हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.