Mahatma Gandhi Quotes in Marathi : महात्मा गांधी यांचे 10 विचार

Gandhi Jayanti Wishes in Marathi: महात्मा गांधी जयंतीनिमित्त त्यांचे सकारात्मक विचार जाणून घ्या 

| Oct 02, 2024, 17:07 PM IST

Gandhi Jayanti Wishes 2024 in Marathi: महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर रोजी देशभरात साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने त्यांच्या जीवनातील सकारात्मक विचार प्रत्येकालाच फायदेशीर ठरतील. 

1/10

चांगल्या बदलाची सुरुवात आधी स्वतःपासून करा

2/10

मित्राशी मैत्री करणे सोपे आहे. पण तुम्ही ज्याला शत्रू समजता त्याच्याशी मैत्री करणे म्हणजे खऱ्या धर्माचे सार आहे.

3/10

एखादी व्यक्ती आपल्या विचारांनी निर्माण केलेला एक प्राणी आहे, तो जे काही विचार करत असतो तसे तो बनत असतो.

4/10

 तुम्ही जे काम कराल ते महत्त्वाचं असू शकतं, पण तुम्ही काहीतरी काम करणं, हे सर्वात महत्त्वाचं असतं...

5/10

आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमच्यावर हसतील नंतर भांडतीलही पण सरतेशेवटी विजय तुमचाच असेल...

6/10

अहिंसा ही मनुष्याची सर्वात मोठी ताकद आहे. हे जगातील कोणत्याही हत्यारापेक्षा अधिक ताकदवान आहे. 

7/10

इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा तुमचा 'स्व' तुम्हाला सापडेल

8/10

ज्या दिवशी एक महिला रात्री रस्त्यावर एकट्याने फिरू शकेल, त्या दिवशी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं असं आपण म्हणू शकतो...

9/10

सत्य आणि अहिंसा हाच माझा धर्म आहे. सत्य हा माझा देव आहे आणि अहिंसा ही त्या देवाची आराधना आहे...

10/10

आयुष्याचा प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस म्हणून जगा आणि असं शिका की तुम्ही अमर राहणार आहात.