साताऱ्यात तीन जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न
प्रजासत्ताक दिनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. (Attempted suicide of three persons in Satara)
सातारा : प्रजासत्ताक दिनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. (Attempted suicide of three persons in Satara) अँट्रोसिटी कायद्याचा अंतर्गत पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करत नाही, या कारणाने मनोहर सावंत यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.
दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आत्मदहनकर्ता मनोहर सावंत यांना वेळीच रोखले आणि ताब्यात घेतले. तर दुसरीकडे कण्हेर प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या पिंपरी शहापूर इथे गावातील काही जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.
345 6\
पिंपरी गावात 25 एकर जमीन महसुल जादा जोडल्याने प्रकल्प ग्रस्ताची गळचेपी होत असल्याच्या कारणावरुन आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला.