विशाल करोळे, प्रतिनिधी, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एक नवा अभ्यासक्रम सुरू होतोय. राजकारणात येऊ इच्छिणा-यांसाठी हा अभ्यासक्रम अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला आता राजकारणी व्हायचं असेल तर त्याचे धडे आता तुम्हाला विद्यापीठात गिरवता येणार आहेत.  येत्या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम विद्यापीठ सुरु करतंय. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली विद्यार्थ्यांना राजकारणाचं महत्व कळावं याकरता मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयात अभ्यासक्रम सुरु केला होता. मात्र बाबासाहेबांच्या निधनानंतर हा अभ्यासक्रम बंद पडला. आता त्यांच्या नावानं असलेल्या विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरु होतोय़.  या अभ्यासक्रमात खासदार, आमदार, आजी माजी मंत्री आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या विषयाचे धडे दिले जाणार आहेत.


राजकारणाचं महत्व आणि लोकप्रतिनिधींची, मंत्र्यांची काम समजावीत, यासाठी हा अभ्यासक्रम असणार आहे. इतकच नाही तर अमेरिकेतल्या संस्थेत जाऊन तिथल्या राजकारणाचा अभ्यास देखील विद्यार्थ्यांना करता येणार आहे. त्यामुळे या राजकारणाच्या अभ्यासक्रमातून घडलेले राजकारणी घराणेशाहीच्या भाऊगर्दीत तग धरतील का हेच पाहणं महत्वाचं ठरेल.