औरंगाबाद : औरंगाबादमध्ये सध्या महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोइंगला मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे. मागच्या निवडणुकीपर्यंत सत्तेत असलेल्या भाजपात इनकमिंग जोरात होते. पण आता ठाकरे सरकारमध्ये इनकमिंग जोरात पाहायला मिळत आहे. यामुळे आता भाजपला आता मोठा धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यासाठी ते मातोश्रीला रवाना झाले आहेत. तनवाणी शिवसेनेतच आमदार होते. मात्र 2014 मधये ते भाजप मध्ये आले होते. 



आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याचा महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा फायदा होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.