काँग्रेस आमदार - जिल्हाधिकारी वादाचा व्हिडिओ व्हायरल
चौधरी यांनी लोकप्रतिनिधींचा अपमान केल्याचं सत्तार यांचा आरोप.
औरंगाबाद : काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या वादाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. दोन दिवसांपूर्वी औरंगाबादेत काँग्रेसनं मोर्चा काढला होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला बराच वेळ बसवून ठेवण्यात आलं. त्यामुळे सत्तार आणि कार्यकर्त्यांचा पारा चढला.
आम्ही उन्हात वाट पाहत बसलो आणि जिल्हाधिकारी एसीमध्ये बसून मिटींग करत बसल्याचा आरोप सत्तार यांनी केला. चौधरी यांनी लोकप्रतिनिधींचा अपमान केल्याचं सत्तार या व्हिडिओमध्ये म्हणतायत.