औरंगाबाद : मुलींची छेड काढणाऱ्या तरुणांना मुलीनी चोप दिला. त्यानंतर छेड काढणाऱ्या मुलांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलींच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे.


 छेड काढणाऱ्या मुलांना चोपले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दोन दिवसांत पुणे, नाशिक, मुंबई सगळीकडेच मुलींवर अत्याचार आणि छेडछाड केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत.. त्यामुळे मुलं सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय. मात्र औरंगाबादेत मुलींची छेड काढणाऱ्या मुलांना मुलींनी चांगलाच चोप दिल्याची घटना समोर आली आहे.


 रिक्षातील मुलींना शिट्या वाजत छेड 


दोन दिवसां पूर्वीची ही घटना आहे. रिक्षातून जाणारी काही मुलं दुसऱ्या रिक्षातील मुलींना शिट्या वाजत छेड काढत होती. त्यांच्यावर कमेंट पास करत होती. या त्रासामुळे संतापलेल्या मुलींनी रिक्षा थांबवत रोडरोमियोंना चांगलाच चोप दिला. इतकचं नाही तर त्यांना पोलिसांच्याही ताब्यात दिलं. पोलिसांनीही या रोडरोमियोंचा चांगलाच समाचार घेतला.