औरंगाबाद : शहरात एक धक्कादायक बात उघड झाली आहे. शुक्रवारी पोलिसांनी जे आयपीएल सट्टा रॅकेट उघड केले. त्यात काम करणाऱ्या सात महिला या शिक्षिका असल्याचे पुढे आले आहे. सट्टा प्रकरणात ११ जणांना अटक करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादेत सट्टा घेण्यासाठी एक छोटे कॉल सेन्टर उभारण्यात आलं होते. त्यात या शिक्षिका काम करत होत्या. यासाठी त्यांना महिना ७ हजार पगार देण्यात येत होता. लोकांकडून गूगल पे किंवा इतर माध्यमातून पैसे घेण्याची आणि भाव सांगण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. औरंगाबादेतून चालणाऱ्या या रॅकेटमधून आयपीएल सट्टेबाजीचा कोट्यवधींची उलाढाल सुद्धा होती असे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.


दरम्यान या प्रकरणात एकूण १८ आरोपी हे कॉल सेंटर चालवत असल्याचे पुढे आले आहे. यातील शिक्षिका सोडता इतर लोकांना अटक करण्यात आली आहे.