औरंगाबाद : १५ हजारांत गर्भलिंगनिदान करणाऱ्या एका डॉक्टरला औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य खात्याने रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पिरबाजार परिसरातल्या एका घरातून डॉक्टर सूरज राणाचा गर्भलिंगनिदान करण्याचा गोरखधंदा सुरू होता. तो १५ हजारांत गर्भलिंगनिदान करायचा. सूरजचे दोन सहकारी आणि दोन रिक्षाचालकांच्या मदतीने हा सगळा प्रकार सुरु होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेली दोन वर्षं हा प्रकार सुरू होता. धक्कादायक म्हणजे या डॉक्टरकडे सोनोग्राफीची पदवी नाही. हा डॉक्टर होमीओपँथीचे उपचार करायचा. त्याने एका डॉक्टरकडून सोनोग्राफी कशी करायची ते शिकून घेतले, सोनोग्राफीचे एक मशीन आणले आणि गर्भलिंगनिदानाचा गोरखधंदा सुरू केला. 


या डॉक्टर सूजर राणाने किती गर्भलिंग निदान चाचण्या केल्या, त्यातून काही गर्भपातही झाले का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.