मुंबई : आस्तिक कुमार पांडे हे औरंगाबादमध्ये महानगरपालिका आयुक्त म्हणून रुजू झाले आणि परभार स्वीकारताच त्यांनी नियंमांप्रमाणे चालण्याचं उदाहरणही दिलं. पांडे, यांना त्यांच्या नियुक्तीबद्दल स्वागताचा पुष्पगुच्छ देण्यासाठी म्हणून नगररचना विभाग प्रमुख आर.एस. महाजन गेले. पण, पुष्पगुच्छासह शुभेच्छा देणं महाजन यांना काहीसं महागात पडलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाजन शुभेच्छा देण्यासाठी गेले खरे, पण त्यांना दंड भरून तेथून परतावं लागलं. आयुक्तांना महाजन यांनी आणलेल्या पुष्पगुच्छला प्लास्टीक असल्याची बाब हेरत त्यांना पाच हजार रुपयांचा स्पॉट फाईन लावला. त्यांच्याकडून ही दंडवसुली करण्याचे आदेश पांडे यांनी दिले. 


पहिल्याच दिवशी आयुक्तांचा हा दणका पाहून त्यांची येणारी कारकिर्द अनेक कारणांनी गाजणार असाच अंदाज वर्तवण्यात येत आहे. मुख्य म्हणजे पांडे यांनी महाजन यांच्या शुभेच्छा आणि त्यांनी दिलेला पुष्पगुच्छ स्वीकारला. पण, त्यानंतर त्यांच्याकडून देण्यात आलेल्या त्या पुष्पगुच्छाला प्लास्टिक असल्याचं सांगत तुम्ही प्लास्टीक वापर केल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्य म्हणजे आयुक्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यावेळी रांगेत अनेकजण उभे होते. प्रत्येकाच्या हातात पुष्पगुच्छ होते, ज्यावर प्लास्टीक वेष्टन होतं. 


विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ



प्लास्टीक वेष्टन हटवत त्यानंतरच तेथे उपस्थित अनेकांनी आयुक्तांना शुभेच्छा दिल्या. जवनळपास दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबादमध्ये आयुक्त सेवेत रुजू झाले आणि त्यांनी पहिल्याच दिवापासून धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली त्यामुळे चर्चा तर होणारच असं म्हणायला हरकत नाही. 


दरम्यान, एकिकडे प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली असूनही अनेक ठिकाणी सर्रास प्लास्टीकचा वापर केला जातो. पण अशा वेळी, काही अधिकारीच अतिशय कर्तव्यदक्षपणे त्यांची जबाबदारी अशा वेगळ्या आणि तितक्याच दणकेदार अंदाजात पार पाडतात तेव्हा अनेकांपुढे आदर्श प्रस्थापित केला जातो हे नाकारता येत नाही.