विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : तब्बल ६५ दिवस उलटून गेले तरी औरंगाबादचा कचरा प्रश्न सुटला नाहीये,त्यात आता कचरा प्रश्न सोडवण्याच्या नादात महापालिका थेट ऐतिहासिक वास्तूंमध्ये कचरा लपवण्याचे उद्योग करत असल्याची धक्कादायक बाब पुढं आली आहे, शहरातील ऐतिहासिक टाऊन हॉलमध्ये कशा पद्धतीनं महापालिकेनं कचरा लपवला याचा पर्दाफाश झी मिडीयानं केला आहे पाहूयात...


अक्षरश: कचऱ्याचे ढीगच्या ढीग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद शहरातील हा ऐतिहासिक टाऊल हॉल, 400 वर्षांचा याला इतिहास आहे, म्हणूनच या इतिहासाचा गौरव करण्यासाठी महापालिकेनं इथ कला दालन सुद्दा सुरु केलंय. मात्र जिथं कला जपायची तिथं सध्या महापालिका कचरा जपतेय..  होय टाऊनहॉलच्या इमारतीत एक टेबन टेनिस कोर्ट सुद्धा उभारण्यात आलं त्या ठिकाणचा सध्या महापालिका कचरा लपवण्यासाठी उपयोग करतेय... कशापद्धतीनं कच-याचे ढिगारे याठिकाणी लावण्यात आले आहे याचा पर्दाफाश झी मिडीयानं केला आहे...


फक्त टाऊन हॉलच नाही तर पैठणगेटमध्ये सुद्दा कचरा लपवण्यात आल्याचं समोर आलं,  हा सगळा प्रकार महापौरांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी याप्रकरणी औरंगाबादकरांची माफी मागत तात्काळ टाऊल हॉलचा कचरा हटवण्याचे आदेश दिले आहेत.



औरंगाबादचा कर्जा प्रश्न सुटणार कधी


माफी मागून हा प्रश्न सुटणारा नाहीये, ऐतिहासिक वास्तूत कचरा लपवणे म्हणजे या वास्तूंचा तो अपमान आहे, तसाही कचरा प्रश्नाने शहराचा कचरा झालाच आहे त्यात आता ऐतिहासिक वास्तूंची विटंबना करून ऐतिहासिक शहराचे नाव आणखीनंच खराब झालय, कारवाई होईलही मात्र खऱच असा कचरा लपवून कचरा प्रश्न  सुटेल का हाच खरा प्रश्न आहे.