विशाल करोळे, झी मीडिया, प्रतिनिधी, औरंगाबाद : औरंगाबादमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत पसरलीय. त्यामुळे पालिका टीकेचं लक्ष्य ठरलीय. औरंगाबादमध्ये मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी हैदोस घातलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अकरा दिवसांत लहान मोठ्यांचे अक्षरक्षा लचके तोडत कुत्र्यांनी २६ जणांना चावा घेतलाय. त्यामुळे ४० हजाराच्या आसपास असणा-या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कोण करणार असा सवाल उपस्थित होतोय.


कुत्रे लहान मुलांना लक्ष्य करत असल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. रस्त्यावर टाकण्यात येणा-या अन्नावर दिवसभर कुत्रे ताव मारत असतात. हे कुत्रे येणा-या जाणा-यांना टार्गेट करतात. त्यामुळे पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही याचे पडसाद उमटेलत.


मोकाट कुत्र्यांची संख्या ४० हजारांवर असली तरी त्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी पालिका कमी पडणार नाही अशी ग्वाही महापौरांनी दिलीय.


गेल्या काही वर्षांत मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप होतोय. त्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या वाढली असून त्यांचा प्रत्यक्षात बंदोबस्त कधी होणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.