`आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीत सहभाग घेणार`
महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनाचं २३वे प्रांतीय अधिवेशन असलेल्या अग्रकुंभ २०१८ कार्यक्रमाचं उदघाटन एस्सेल समूहाचे मार्गदर्शक आणि राज्यसभा खासदार सुभाष चंद्रा यांच्या हस्ते झालं.
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनाचं २३वे प्रांतीय अधिवेशन असलेल्या अग्रकुंभ २०१८ कार्यक्रमाचं उदघाटन एस्सेल समूहाचे मार्गदर्शक आणि राज्यसभा खासदार सुभाष चंद्रा यांच्या हस्ते झालं. अग्रवाल सभा औरंगाबाद यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना अग्रवाल समाज मदत करणार आहे, त्यात आपणही सहभागी असणार आहोत अशी ग्वाही यावेळी सुभाष चंद्रा यांनी दिली. देशात जातीच्या नावावर सध्या गोंधळ सुरु आहे. यावर सर्वांनी एकत्र येऊन देशाला अधिक सक्षम करण्याचं आवाहनही सुभाष चंद्रा यांनी केलं.