वाघांच्या सहवासाला कायदेशीर बंदी, पाहा कुठे घडलीये ही घटना
अरेरे.... वाघांनाही लंबी जुदाई
औरंगाबाद : खुल्लमखुल्ला प्यार वगैरे संकल्पनांना कितीही मोकळीक मिळालेली असली तरीही अनेकांनाच ही बाब खटकते. जिथं मनुष्यावरच अशा आशयानं काही बंधनं लावण्यात येतात तिथं आता प्राणीही वेगळे राहिलेले नाहीत.
महाराष्ट्रात एक अशी घटना घडली आहे, जिथं वाघ आणि वाघिणीच्या एकत्र सहवासाला टाळण्यासाठी त्यांना वेगळं ठेवलं जाणार आहे.
आता हे नेमकं का, तर यामागं आहे एक महत्त्वाचं कारण.
प्राणीसंग्रहालयामध्ये वाघ तर आहेत. पण, इथं असणाऱ्या वाघोबांना ही जागा कमी पडत असल्यामुळं नाईलाजानं सिद्धार्थ प्राणीसंग्रहालय येथे वाघांच्या सहवासावर आळा घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार इथं 12 वाघ आहेत. जिथं वाघिणी दरवर्षी बछड्यांना जन्म देत आहेत.
परिणामी इथं असणारी जागा वाघांच्या या वाढत्या कुटुंबांना अपुरी पडू लागली.
ज्यामुळं प्राणीसंर्गहालतयातील वाघ आणि वाघिणींना वेगळं ठेवण्यात येणार आहे.
केंद्रीय प्रासंग्रहाल मंडळाकडून देण्यात आलेल्या निर्देशांनुसार आता वघोबांमध्ये जाणिवपूर्वक दुरावा आणला जाणार आहे.
आतापर्यंत कुटुंब नियोजनाच्या उद्देशानं काही योजनांच्या जाहिराती तुम्ही ऐकल्या असतील. पण, आता हे प्रकरण मनुष्यापुरतंच मर्यादित न राहता जागेचा प्रश्न या प्राण्यांनाही भेडसावू लागला आहे, ज्यामुळं त्यांना काहीही समजत नसतानाही या साऱ्याचा सामना करावा लागत आहे.