COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद : औरंगाबादच्या वाळूज परिसरामध्ये एका महिलेला मुले पळवणारी  समजून बेदम मारहाण करण्यात आलीय. वाळूजमधील अविनाश कॉलनीत ही घटना घडलीय. रांजणगाव येथे राहणारी एक महिला भाड्यानं रूम शोधण्यासाठी आली होती. मुलांचं अपहरण करण्याच्या संशयावरून लोकांनी या महिलेला बेदम मारहाण केली.त्यानंतर त्या महिलेला वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतलं. औरंगाबाद शहराच्या पडेगावमध्ये दोन तरुणांना चोरी करण्याच्या संशयावरून मारहाण केल्यानंतर त्यापाठोपाठ आज शहरात ही दुसरी घटना घडलीयं.


शेकडो नागरिकांची मारहाण 


चोरीच्या अफवेने औरंगाबादच्या पाडेगाव येथे दोन संशयितांना शेकडो नागरिकांकडून  बेदम मारहाण करण्यात आल्याची घटनाही घडली होती.यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना छावणी पोलिसांनी वेळीच पोहचत लोकांच्या तावडीतून या दोघांची सुटका केली आहे.. या आधी गेल्या आठवड्यात औरंगाबादच्या वैजापूर मध्ये 2 जणांचा अशाच मारहाणीत मृत्यू झाला होता.