औरंगजेबाचा उल्लेख करत तरुणाने बनवला रिल, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल... Video
`आजही औरंगजेबच्या कबरीवर चादर चढवितात` असा उल्लेख करत रिल्स बनवणं पडलं महागात, तरुणावर संभाजी नगरात गुन्हा दाखल
विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : औरंगजेबाच्या कबरीवर (Aurangjeb Kabar) आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) आणि खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी भेट देऊन चादर चढविली होती. त्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होत. हे प्रकरण निवळत नाही तोच संभाजीनगरमध्ये नवा वाद उभा राहिला आहे. एका तरुणाने सोशल मीडियावर (Social Media) एक रिल पोस्ट केला असून यावरुन वाद निर्माम झाला आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्या तरुणाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणाने बनवला आक्षेपार्ह व्हिडिओ
संभाजीनगरमध्ये राहाणारे प्लॉटिंग व्यवसायिक शेख रहीम यांना unique _rushi _2001 या अकाऊंटवर एक व्हिडिओ दिसला. या व्हिडिओतील तरुणाने आजही औरंगजेबच्या कबरीवर चादर चढवतात, असा उल्लेख करत रिल्स बनवला होता. याबरोबरच त्याने व्हिडिओत काही आक्षेपार्ह शब्दांचाही वापर केला होता. ज्यामुळे धार्मिक भावना (Religious Sentiments) दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतला आहे.
पोलिसांनी शेख रहीम यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस स्थानकात त्या तरुणाविरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
औरंगजेबच्या कबरीवर चादर चढवण्यावरुन वाद
एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी आणि खासदार इम्तियाज जलील यांनी गेल्या वर्षी संभाजीनगरमधल्या औरंगजेबाच्या कबरीला भेट देत चादर चढवली. अकबरुद्दीन ओवैसी एका शाळेच्या उद्घाटनासाठी संबाजीनगरमध्ये आले होते. पण शाळेच्या उद्घाटनबरोबर ते थेट औरंगाबादेतल्या औरंगजेबाच्या कबरीवर (Aurangjeb kabar) पोहोचले आणि तिथ जाऊन त्यांनी चादर चढवली. यावरुन नवा वाद उभा राहिला होता. शिवसेने नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी यावर जोरदार टीका केली होती.
ज्या औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना हाल हाल करून मारलं. त्याचं उदात्तीकरण कश्यासाठी..? असा सवाल आता खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला होता. तर जलील यांनी मुलाचं नाव औरंगजेब का ठेवलं नाही? म्हणत या चंद्रकांत खैरे यांनी या घटनेचा समाचार घेतला.