औरंगाबादच्या कचऱ्यांचा प्रश्न मुंबईत सोडवण्याचा प्रयत्न
कचऱ्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापौर नंदकुमार घोडीले, आयुक्त दीपक मुगलीकर मुंबईत आलेत.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये कचऱ्याचा तिढा कायम आहे. आज कचऱ्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापौर नंदकुमार घोडीले, आयुक्त दीपक मुगलीकर मुंबईत आलेत.
कचराप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
कचराप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी आज हे दोघे मुंबईला आलेत. नारगावातील नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध आहे. त्यामुळे शहरात कचऱ्याचे ढिग कायम आहेत.
नागरिकांनी मास्क वापरण्याचं आवाहन
दुसरीकडे, औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य वाढत चाललं आहे. औरंगाबाद महापालिकेनेही रस्त्यावर लोकांनी मास्क वापरावेत असं आवाहन केलं आहे.
कचरा टाकण्यासाठी जागा मिळेल का?
इतर ठिकाणी कुठे कचरा टाकण्यासाठी जागा मिळेल का? याची चाचपणी महापालिकेकडून सुरू आहे, मात्र महापालिकेला अजून कोणतीही जागा शोधता आलेली नाही. तर दुसरीकडे संबंधित गावकरी याबाबतीत महापालिकेवर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत.