Yavatmal Accident  News​ : यवतमाळमध्ये एक विचित्र घटना घडली. अपघात झाल्यानंतप संतप्त जमावाने कायदा हातात घेतला.  कारच्या धडकेत ऑटोचालक ठार झाला. यानंतर संतप्त जमावाने कार पेटविली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि  त्यांच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. 


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जय काटोले असे मृत ऑटो चालकाचे नाव आहे. यवतमाळमध्ये राहणारा जय हा नेमहीप्रमाणे पहाटेच्या सुमारास आर्णी मार्गावर जिल्हा परिषद कार्यालयासमोर ऑटो घेऊन उभा होता. दरम्यान भरधाव आलेल्या कारने त्याच्या ऑटोला जोरदार धडक दिली. कारची धडक इतकी जोरदार होती. जय याचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. 


अपघातानंतर कार चालकाने आपली करा दत्तचौक भाजी मंडईत उभी केली होती. या अपघातामुळे एकच गोंधळ उडाला होता. मृत ऑटोचालकाच्या नातेवाईकांनी आलिशान कार पेटवून दिली.  याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून अवधुतवाडी पोलीस कारवाई करीत आहे.


एका तासात दोन अपघात


इंदापूर तालुक्यात एका तासात दोन अपघात झाले आहेत. दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.अवघ्या पाच किलोमीटर अंतरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे अपघात घडले आहेत. मारुती उर्फ लालासाहेब शंकर धातुंडे, बाबुराव जगन्नाथ कोकरे व संजय रखमाजी कुंभार अशी मृतांची नावे आहेत. यातील धातुंडे हे इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील रहिवासी आहेत तर कोकरे आणि कुंभार हे दोघेही सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टाकळी गावचे रहिवासी आहेत.


शेतातून घरी जाताना मृत्यूने गाठले


जंक्शन येथे सकाळी कळस रस्त्यावरील खरजुलवस्ती परिसरात टाटा इंट्रा व सायकलचा अपघात झाला. या अपघातात भरणेवाडी येथील मारुती उर्फ लालासाहेब शंकर धातुंडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. धातुंडे हे आपल्या सायकलने शेतातून घरी निघाले होते.या दरम्यान पाठीमागून वेगाने आलेल्या टाटा इंट्रा कारने धातुंडे यांना पाठीमागून जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिली आहे.


क्रेनच्या धडकेत बाईकस्वार ठार


सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास इंदापूर बारामती रस्त्यावर शेळगाव हद्दीत क्रेन आणि दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील बाबुराव जगन्नाथ कोकरे व संजय रखमाजी कुंभार यांचा मृत्यु झाला असून हे दोघेही सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टाकळी गावचे रहिवासी आहेत. यातील कोकरे हे पाटस येथील साखर कारखान्यातून निवृत्त झाले होते. त्यामुळे आपली पेन्शन काढण्यासाठी सकाळी दुचाकीवरून पाटसकडे निघाले होते. शेळगाव येथून जात असताना समोरून येत असलेल्या क्रेन चालकाने क्रेन विरुद्ध दिशेने थेट अंगावर आणल्याने दुचाकी क्रेनखाली गेली. त्यामुळे अपघात होऊन त्यामध्ये कोकरे यांचा जागीच मृत्यू झाला तर कुंभार यांना उपचारासाठी इंदापूर येथे नेले असताना त्यांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.