मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था, रिक्षा चालक संतप्त
रिक्षा व्यावसायिक रस्त्यावर
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाची पुरती दुरावस्था झाली आहे. या स्थितीला कंटाळलेल्या रिक्षा व्यावसायिकांनी अखेर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. चिपळुणमधील विविध भागातील रिक्षा व्यावसायिक रस्त्यावर उतरले. नगर परिषदेसमोरून मोर्चाला सुरवात झाली. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महामार्गाच्या या अवस्थेमुळे रिक्षा चालकांचं आर्थिक कंबरडे मोडलं आहे. वर्षाला हजारो रुपयांचे टॅक्स भरायचा आणि गाडीच्या मेंटेनन्स वर पुन्हा खर्च करायचा यामुळे रिक्षाव्यवसायाचे गणित बिघडलं आहे.
प्रांत कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत अधिकाऱ्यांना जाब विचारला.