Travel on Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. अतिवेगाने समृद्धी महामार्गावरून गाडी चालवणं शक्यतो टाळा. महामार्गावर वेगवान प्रवास करताना वाहनांचे टायर कधीही धोका देऊ शकतात. त्यामुळे ऑटोमोबाईल तज्ज्ञांनी या प्रवासात टायरची काळजी घेण्याचा सल्ला दिलाय. 


टायर फुटून अपघात होऊ शकतो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समृद्धी महामार्गाने वेगाने गाडी चालवताना टायरवर दाब येऊन टायर फुटून अपघात होऊ शकतो, असं सांगण्यात येत आहे. ताशी 150 किमी वेगाने या मार्गावरुन प्रवास करु शकता, पण त्यासाठी मोठी रिस्क घ्यावी लागेल. वाहनाच्या टायरमध्ये साधी हवा भरल्यावर नॉनस्टॉप गाडी चालवल्यास टायरमधील हवा प्रसरण पावून टायर फुटण्याचा धोका असतो. त्यामुळे नायट्रोजन भरावं, असा सल्ला देण्यात आला आहे. टायरची साईडवॉलही चेक करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. 


देशातील सर्वात वेगवान अशा महामार्गांपैकी एक


देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई (Mumbai) 701 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाने (Samruddhi Expressway) महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरशी जोडली जात आहे. हा महामार्ग देशातील सर्वात वेगवान अशा महामार्गांपैकी एक असणार आहे. 


मुंबई - नागपूर सात तासात


नागपूर ते शिर्डीपर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. हा मार्ग 10 जिल्ह्यांतील 392 गावांमधून धावेल आणि दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सात तासांपर्यंत कमी करेल. आजपासून एसटी धावणार असून सामान्य नागरिकांसाठी समृद्धी महामार्ग खुला होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास हा 17 तासांवरुन हे अंतर 7 तासांवर येणार आहे. सध्या नागपूर ते मुंबई हा बाय रोड प्रवास करताना 15 तास लागतात.



या महामार्गावर ताशी 150 किमी वेगाने वाहने चालवता येतील. या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. या प्रवासासाठी 6 ते 7 तासांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, या समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी टोल टॅक्स (Toll tax) भरावा लागणार आहे.