Avoid These Mistakes While Issuing Cheques: सायबर क्राइम (Cyber Crime) आणि सायबर फ्रॉडच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. अशावेळी बँकेसंबंधीत व्यवहार करतानादेखील सावधगिरी बाळगावी लागते. चेकच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार करतानासुद्धा फसवणूक होऊ शकते अशावेळी चेकवर सही करताना या चुका टाळाव्यात अन्यथा एका चुकीमुळं तुमचं बँक खाते रिकामे होऊ शकते. चेकवर सही करण्यापूर्वी या चुका टाळाव्यात. ( Issuing Bank Cheques)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्तापर्यंत चेकच्या माध्यमातून होणारा व्यवहार हा सुरक्षित समजला जायचा. पण आता हॅकर्सच्या लिस्टवर बँकेच्या व्यवहारही आले आहेत. व्यवहारांसाठी चेकचा वापर करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण एक चुकीची गोष्टही तुमचं बँक अकाउंट खाली होऊ शकते. चेकवर सही करत असताना या गोष्टींची काळजी घ्या. 


जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या नावाने चेक जारी करत आहात. तर, रक्कम लिहल्यावर त्याच्यापुढे only असं लिहायला विसरु नका. चेकच्या पुढे only लिहणे गरजेचे असते कारण त्यामुळं फसवणुकीचे प्रकार घडू शकत नाहीत. त्यामुळं रक्कम शब्दांत लिहल्यानंतर त्याच्यापुढे only असं लिहा. 


खाली चेकवर सही करु नका 


कधीच ब्लँक चेकवर सही करु नका, कारण तुमच्या सहीचा गैरवापर करुन अकाउंटमधून पैसे काढले जाऊ शकतात. त्यामुळं सगळ्यात पहिले चेकवर नाव, अमाउंट आणि तारिख लिहा.  तसंच, चेकवर माहिती भरताना नेहमी तुमच्या पेनाचाच वापर करा. 


चुकीची सही 


चेक फाडणाऱ्या व्यक्तीची सही बँकेच्या रेकॉर्डमध्ये असलेल्या सहीसोबत जुळली नाही तर तुमचा चेक बाउन्स होऊ शकतो. बँक अशावेळी चेक क्लिअर करत नाही. त्यामुळं चेकवर देण्याआधी तुमची सही बरोबर आहे का यांची पडताळणी करुन घ्या.


तारीख योग्य लिहा


चेकवर असलेली तारीख बरोबर आहे का याची पडताळणी करा. ज्यादिवशी तुम्हाला बँकेत चेक जारी करायचा आहे त्याचदिवशीची तारीख आहे का? याची खात्री करुन घ्या. 


चेकवर परमनेंट इंकचा वापर करा 


चेकसोबत काही छोडछाड होऊ शकते यापासून वाचण्यासाठी परमनेंट इंकचा वापर करावा. जेणेकरुन यात नंतर काही बदल होऊ शकत नाही. व तुमची फसवणूक होण्यापासून रोखता येते.