आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य खडीवालेंचं निधन
आयुर्वेदतज्ज्ञ आणि सामाजिक कार्याला सढळ हस्ताने मदत करणारे परशुराम यशवंत तथा प.य. वैद्य खडीवाले यांचे आज दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी निधन झालं.
पुणे : आयुर्वेदतज्ज्ञ आणि सामाजिक कार्याला सढळ हस्ताने मदत करणारे परशुराम यशवंत तथा प.य. वैद्य खडीवाले यांचे आज दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी निधन झालं.
गेल्या महिन्यांत त्यांच्या खुब्याला दुखापत झाली होती. उपचारासाठी त्यांना जोशी हॉस्पिटल मध्ये दाखल केलं होतं. मात्र या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं पार्थिक दुपारी ४ ते ६ या वेळेत पुण्यातल्या शनिवार पेठ येथील आयुर्वेद कारखाना अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधी पार पाडले.