Baba Vanga Predictions: जगातील अनेक Windows वापरकर्त्यांना संगणक वापरताना निळ्या स्क्रीनच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. काम सुरु असतानाच संगणक  निळी स्क्रीन येऊन ते रीस्टार्ट होत आहेत. CrowdStrike नावाच्या अँटी-व्हायरस कंपनीने नुकत्याच केलेल्या अपडेटमुळे ही समस्या उद्भवल्याचे मायक्रोसॉफ्टचे म्हणणे आहे. त्यांच्या सेवेतील समस्या संध्याकाळी 6 च्या सुमारास सुरू झाली. अमेरिकेत देखील Azure सेवा वापरणाऱ्या काही ग्राहकांना ही समस्या आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट X वर #CyberAttack हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. परंतु कंपनीने सायबर हल्ल्याचा दावा फेटाळला आहे. सोशल मीडियावर या प्रकरणी ट्रेंडही सुरू झाला आहे. बाबा वेंगा यांनी वर्षांपूर्वी 2024 साठी दिलेली भविष्यवाणी खरी ठरत असल्याचं म्हटलं जात आहे. 


 बाबा वेंगांची भविष्यवाणी काय? 


बाबा वेंगा यांनी अनेक वेळा भविष्यवाणी केली आहे. 9/11 आणि ब्रेक्सिट सारख्या घटनांचे भाकित करण्यासाठी बाबा वेंगा यांना ओळखलं जाते. त्यांनी 2024 साठी केलेली भविष्यवाणी देखील त्रासदायक आहे. तांत्रिक आपत्ती, वैद्यकीय क्षेत्रातील आपत्ती आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होणार अशी बाबा वेंगा यांनी अंदाज वर्तवला होता. त्यामधील तांत्रिक आपत्ती खरी ठरताना दिसत आहे. 


तांत्रिक आपत्तीबद्दल काय म्हटले होते? 


2024 साठी बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केली होती. ज्यामध्ये त्यांनी तांत्रिक आपत्तीचा देखील उल्लेख केला होता. सध्या बाबा वेंगा यांची तांत्रिक आपत्तीवरील भविष्यवाणी खरी ठरताना दिसत आहे. यामध्ये सायबर हल्ल्यांचा समावेश किंवा प्रणालींमध्ये बिघाड होऊ शकतो. आज Microsoft ठप्प पडल्याने अनेक सेवांवर परिणाम झाला होता. 


मायक्रोसॉफ्ट बिघाडचा या गोंष्टीवर परिणाम


मायक्रोसॉफ्टमध्ये बिघाड झाल्याने अनेक गोष्टी ठप्प झाल्या. ज्यामध्ये विमान सेवा, बँका, शेअर मार्केट, बाजार पेठ, पेमेंट सिस्टम आणि आपत्कालीन सेवांवर मोठा परिणाम झाला. 


या सेवा अजूनही आहेत बंद 


सुरक्षा उपाय देणाऱ्या  CrowdStrike नावाच्या कंपनीच्या सॉफ्टवेअरमुळे मायक्रोसॉफ्टमध्ये बिघाड झाल्याचं म्हटलं जातेय. सध्या काही ठिकाणी सेवा सुरु झाली आहे. परंतु PowerBI, Fabric, Teams, Purview आणि Viva Engage च्या सेवा अजूनही वापरकर्त्यांसाठी बंद आहेत.