जालन्यातील दिग्गज नेते राजेश टोपे आणि बबनराव लोणीकर यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये बबनराव लोणीकर राजेश टोपेंना शिवीगाळ करत असल्याचं ऐकू येत आहे. जालना जिल्हा बँक निवडणुकीवरुन झालेल्या वादातून ही शिवीगाळ झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान झी 24 तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी झालेल्या जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून माजी मंत्री बबनराव लोणीकर आणि माजी मंत्री राजेश टोपे यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता दोन्ही आमदारांची एक तथाकथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.



ऑडिओ क्लिपमध्ये नेमका काय संवाद आहे?


राजेश टोपे - माझ्यात आणि त्यांच्यात एवढंच झालं की, आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय. त्यांना म्हटलं की तुम्ही यावेळेस सोडावं. ते नाही म्हणाले.
 


बबनराव लोणीकर - भैय्यासाहेब राजकारण मोठं नसतं. त्या उपाध्यक्षपदात काही नाही. आम्हालाही माहिती आहे. आणि तुम्ही शब्द दिला, अर्जुन खोतकरांच्या बंगल्यावर बोललात.
 


राजेश टोपे - शब्द पाळू की, पण पुढच्या वेळेस पाळू
 


बबनराव लोणीकर - अरे हरामखोर xxxxx, तुझ्या xxxxx, तुझं टक्कल फोडतो xxxx, मायचा xxxxx, चोर, कुत्रा


 


ऑडिओ क्लिप खोटी असल्याचा लोणीकरांचा दावा


बबनराव लोणीकर यांनी 'झी24 तास'शी बोलताना ही ऑडिओ क्लिप खोटी असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले आहेत की, "मी ऑडिओ क्लिप पाहिली किंवा ऐकलेली नाही. जर अशी काही ऑडिओ क्लिप असेल तर ती खरी नाही. आम्ही तीन पक्षाच्या लोकांनी एकत्र बसून चर्चा केली होती, काही निर्णय घेतले होते. त्यावेळी काही वाद झाले होते. पण ही ऑडिओ क्लिप खरी नाही".