Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2024: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. महाड यथील ऐतिहासिक चवदार तळे येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. महाड येथे शिवसृष्टी प्रमाणे भिमसृष्टी साकारणार असल्याची मोठी घोषणा आमदार भरत गोगावले यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाड चवदार तळे सत्याग्रह इतिहासातील अत्यंत महत्वाचे पान आहे. 20 मार्च 1997 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून सत्याग्रह केला होता.सार्वजनिक ठिकाणं, पाणवठे आणि चवदार तळं अस्पृश्यांसाठी खुलं करण्यात यावं यासाठी हा सत्याग्रह करण्यात आले होते. महाड चवदार तळे हे ऐतिहासिक ठिकाण आहे. 


डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने आमदार भरत गोगावले यांनी महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यावर उपस्थित राहून डाॅ. आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. चवदार तळे सुशोभीकरणासाठी यापूर्वीच सात कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून यानिधीचा वापर करून कामे केली जातील तसेच शिवसृष्टी प्रमाणेच भिमसृष्टी देखील साकारण्याचा मानस त्यानी व्यक्त केला. या सरकारकडून भिमसृष्टी उभारली जाईल अशी घोषणा गोगावले यांनी केली. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज 68 वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त महाड इथल्या ऐतिहासिक चवदार तळ्याच्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. यामुळे चवदार तळ्याचा संपूर्ण परिसर रंगीबेरंगी प्रकाशात न्हावून निघालाय.