Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2024: 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. महापरिनिर्वाणानंतर आंबेडकरांचे अनुयायी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मिळेल त्या वाहनानं मुंबईच्या दिशेनं रवाना होऊ लागले. ही बातमी अमरावतीतल्या नया अकोला इथल्या पिरखाजी खोब्रागडे आणि  रामजी छापाणी यांना माहित पडताच त्यांनी थेट मुंबई गाठली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या  अंत्यविधीत सहभागी झाले. अत्यंविधी झाल्यानंतर दोघांनी  चैत्यभूमी शेजारील परिसरात रात्रभर मुक्काम ठोकला.  त्यानंतर पहाटे पिरखाजी खोब्रागडे यांनी बाबासाहेबांच्या काही अस्थी आपल्या रुमालमध्ये गुंडाळून नया अकोला इथं घेऊन आले.  9 डिसेंबर 1956 रोजी गावकऱ्यांच्या सहभागाने एका बौद्ध विहारात तांब्याच्या पात्रात तीन फुटाचा खड्डा करून बाबासाहेबांच्या अस्थी स्थापित करण्यात आल्यात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी स्थापित झाल्यानंतर या प्रती चैत्यभूमीला भेट देण्यासाठी आतापर्यंत लाखो अनुयांनी भेट दिलीय. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा  भैयासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, सुखदेवराव तिडके, जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांनी या प्रती चैत्यभूमीला भेट दिलीय. 


मुंबईत उसळला जनसागर 


महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबडेकर यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलंय. चैत्यभूमीवर जाऊन मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलंय.. राज्यपाल  कृष्णण यांनीही बाबासाहेबांना अभिवादन केलंय.. त्यानंतर बाबाहेबांना मानवंदना देण्यात आलीय.. तर चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आलीय.  शाहिर संभाजी भगत यांनीही भीम गीतातून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलंय.