गाईसोबतचा हा सेल्फी खास आहे, पशु प्रेमाचं या पेक्षा उत्तम उदाहरण तुम्ही कधीच ऐकलं नसेल
प्राण्यांवर कोणी किती प्रेम करु शकतं... हे या घटनेतून तुम्हाला लक्षात येईल.
योगेश खरे, नाशिक : शहरी भागात कुत्र्या मांजरांचा वर विशेष प्रेम असते तर ग्रामीण भागात पाळीव प्राण्यांना आपल्या घरातल्या सदस्याचा दर्जा दिला जातो. अशाच एका पाळीव प्राण्याचे डोहाळे जेवण नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात पार पडले. सर्वजण आपल्या सुना मुलींचे डोहाळे जेवण योग्य वेळी करत असतात. तुम्ही म्हणाल डोहाळे जेवण यात काय विशेष आहे? हो , विशेषच आहे. कारण हे डोहाळे जेवण कुणा आपल्या मुलीचे किंवा सुनेचे नाही तर ते चक्क पाळलेल्या गाईचे होते. प्रथमच गरोदर राहिली म्हणून सर्व मानवी डोहाळे जेवणाचे सोपस्कार पूर्ण केले.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याच्या गोंडेगाव या गावातील प्रगतशील शेतकरी श्री तानाजी दाते व दादासाहेब दाते या कुटुंबातील मातोश्री श्रीमती रंगुबाई खंडेराव दाते वय वर्ष 96 यांनी अगदी लहानपणापासून जोपासलेल्या कालवडीची धष्टपुष्ट गाय गेल्या दोन वर्षात बनवली तिचे नाव कपिला ठेवण्यात आले.
कपिला ही अगदी लहानपणापासूनच या घरात आल्याने सर्वांनाच तिच्या गोंडस रूपाने पूर्ण परिवाराला भुरळ घातली. श्रीमती रंगुबाई दाते यांनी विशेष लक्ष या वासरी कडे दिले. त्यामुळे त्यांचा जास्तच लळा या गाईला लागला. एखाद्या अल्लड मुलीप्रमाणे या दाते परिवाराच्या अंगणात लहानाची मोठी झालेली कपिला सर्व सदस्य तिचे सर्व लाड करू लागले.
दिवसागणिक कपिला मोठी होत राहिली आणि सर्व घराला एक आनंदाची बातमी काही दिवसातच कळली .ती म्हणजे कपिला गरोदर आहे आणि दाते परिवारात एक आनंदाची लहर सर्वांच्या चेहर्यावर जाणवू लागली .विशेष आनंद हा आजी रंगुबाई दाते यांना .कारण त्यांनी सर्वात जास्त जीव तिला लावलेला होता.
आजी रंगुबाई यांनी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करायचा असा आग्रह आपली मुलं श्री तानाजी दाते व खंडेराव जाते यांच्याकडील मांडला आणि त्यांनी होकार देताच आजींच्या सुना सौ संगीता दाते आणि सौ नंदा दाते यांनी आपल्या एखाद्या मुलीच्या किंवा सुनेचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे अशा पद्धतीने सर्व कार्यक्रम घडवून आणत, आंबे रस पुरणपोळी मांड्यांचे जेवण तयार केले या डोहाळे जेवणाला.
दाते परिवाराच्या अत्यंत जवळचे आणि आप्त जे गरजेचे आहे अशा मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रित करून कोरोना चे सर्व नियम पाळत डोहाळे जेवणाचा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला .घरातील सर्व परिवार कपिला कडे जातीने चारापाणी आणि खुराक याबाबत सजग झाला .सर्व परिवाराने या कपिला लहानची मोठी आपल्या डोळ्यासमोर होताना बघितले त्यामुळे या गोड बातमीने सर्वांचाच उत्साह द्विगुणित झाला .
उत्सवमूर्ती कपिला तिला गरोदर महिले प्रमाणे सजवण्यात आले तिचे फोटो काढण्यात आले. सात सुवासिनींनी तिला औक्षण केले. तिला हिरवी साडी व सर्व सौभाग्य अलंकार देऊन तिची ओटी भरली अनेकांनी डोहाळे जेवणाच्या वेळी जी गाणी म्हटली जाते ती गाणी सुद्धा महिलांनी म्हटली .
एखाद्या स्त्रीचे पहिले बाळंतपण करण्या अगोदर चे सर्व सोपस्कार व डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करुन हा भावनिक आणि कौटुंबिक स्तरावर आजी रंगुबाई दाते यांनी आपल्या परिवारात घडून आणला .डोहाळे जेवण आपल्या आजूबाजूला राज्यात आणि देशात कुठे ना कुठे नेहमी होतच असते ,पण केवळ पाळलेल्या गायी चे पहिल्या गरोदरपणाचे डोहाळे जेवण ते पण सर्व पारंपरिक विधी पार करत गोडधोड जेवण तयार करीत करण्याचा दाते परिवाराचा कदाचित राज्यात किंवा देशात पहिलाच उपक्रम असावा .या वेळी हा उत्साह आणि सोहळा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.
सध्या मुलगी झाली म्हणून नकोशी ठरवून तिला कुठेतरी आड मार्गाला किंवा कचराकुंडीत फेकून देणाऱ्या समाजातील त्या पुरुषी वृत्तीला आजी रंगुबाई खंडेराव जाते यांनी 96 व्या वर्षी आपल्या सुना सुना मुलांच्या सहकार्याने कृतीयुक्त दिलेली चपराक युक्त संदेश म्हणावा लागेल. खरंतर हा आगळावेगळा कार्यक्रम करण्याची कल्पना 96 वर्षीय आजी रंगुबाई खंडेराव दाते या कपिला गायीच्या पालकाचीच...