अमरावती : मागील काही दिवसांपासून पंजाब, हरियाणा, राजस्थान आदी राज्यातील हजारो शेतकरी हे केंद्र सरकारच्या कृषी कायदा विरोधात दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करीत आहे. दरम्यान या शेतकऱ्यांना कृषी कायद्याला विरोधच करायचा आहे तर त्यांनी दुसरीकडे जाऊन मरावं असं विधान केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारीया यांनी केलं. या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय मंत्री रतनलाल कटारीया यांच्या या वक्तव्याचा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चांगलाच समाचार घेतला असून रतनलाल कटारीयांनी तात्काळ या शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा त्यांचं तोंड काळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा ईशारा राज्यमंत्री बच्चू कडु यांनी दिला आहे.


यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले रतनलाल कटारिया हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत. आणि त्यांनी शेतकऱ्यांबाबत हे वक्तव्य करणं चुकीचे आहे. तुम्ही जर शेतकऱ्यांसाठी मरायची भाषा वापरत असालं तर मग आम्ही तुम्हाला मारायसाठी यायचं का ? असा सवाल बच्चू कडू यांनी केलाय.



एकतर शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीसाठी प्रतिसाद न देणे त्यांना सहानुभूती देण्याऐवजी तुम्ही जर त्यांना मारण्याची भाषा करत असाल तर आम्हाला आंदोलन सोडून तुम्हाला कुठं पाठवायाच हे ठरवावे लागेल असे ते म्हणाले.


रतनलाल कटारिया यांनी आता शेतकऱ्यांची तात्काळ माफी मागितली पाहिजे अन्यथा आम्ही त्यांचं तोंड काळ केल्याशिवाय राहमार नाही ईशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलाय.