`रवी राणा-बच्चू कडू वाद म्हणजे जनतेचे प्रश्न दुर्लक्षित करण्यासाठी ठरवून केलेला खेळ`
रवि राणा यांनी बच्चू कडू या दोन्ही आमदारांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते.
जयेश जागड, झी मीडिया, मुंबई : रवि राणा यांनी बच्चू कडू या दोन्ही आमदारांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते. त्यांच्या वादाचे पडसाद महाराष्ट्र सरकारच्या राजकरणावर दिसताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना त्या वादात मध्यस्थीची भूमिका घ्यावी लागली. त्यांनी दाखवलेल्या या मोठ्या मनाला बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. दरम्यान यानंतर अमरावतीला (Amravati) परतल्यानंतर बच्चू कडू यांनी जाहीर बैठक घेतली. या बैठकीत कडू यांनी राणा यांना थेट इशाराच दिला आहे. (Bachchu Kadu vs Ravi Rana - NCP MLA Amol Mitkari says BJP Shinde government diverts people's attention to other nz)
हे ही वाचा - चक्क पोलिसांच्या खुर्चीवर बसून बनवले रिल्स... व्यावसायिकाला पडलं महागात
राणा-कडू यांच्यातील नक्की वाद काय?
कडूंनी गुवाहाटीला जाऊन 50 खोके घेतल्याचा आरोप राणा यांनी केला होता. तसेच कडू 'तोडपाणी' करणारा आमदार आहे, असा गंभीर आरोपही राणांनी केला होता. या आरोपानंतर कडूंनी आक्रमक होत राणांना आव्हान दिलं होतं. "राणा एका बापाचा असेल तर त्याने पुरावा द्यावा. जर केलेला आरोप खरा ठरला तर त्याच्या घरी भांडी घासेन", अशा शब्दात कडूंनी राणांना आव्हान दिलं होतं.
हे ही वाचा - काही नेते कार्यकर्त्याला आदेश देतात, आमच्याकडे कार्यकर्ता नेत्याला आदेश देतो - बच्चू कडू
या वादावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया...
या वादावरुन राजकरणात आता सगळेच आपले हात धुवून घेत आहेत. रवी राणा आणि बच्चू कडू यांचं सुरू असलेल वाद हे ठरवून कलेला वाद असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी केलाय. महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न वेगळे असून लोकांचा लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजप आणि शिंदे सरकारने केलेला खेळ असल्याचं मिटकरी म्हणाले. कोणी, किती खोके घेतले आणि खरच घेतलेत का याच स्पष्टीकरण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी करावं असंही मिटकरी म्हणाले...तर राणा आणि बच्चू कडू दोघांचं समेट झाल्याचं आनंदही त्यांनी व्यक्त केला.