काही नेते कार्यकर्त्याला आदेश देतात, आमच्याकडे कार्यकर्ता नेत्याला आदेश देतो - बच्चू कडू

 रवि राणा यांनी बच्चू कडू या दोन्ही आमदारांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते.

Updated: Oct 31, 2022, 08:43 PM IST
काही नेते कार्यकर्त्याला आदेश देतात, आमच्याकडे कार्यकर्ता नेत्याला आदेश देतो - बच्चू कडू title=
Ravi rana vs Bachchu kadu said that here workers gives orders to leaders maharashtra news marathi nz

पराग ढोबाळे, झी मीडिया, नागपूर : रवि राणा यांनी बच्चू कडू या दोन्ही आमदारांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते. त्यांच्या वादाचे पडसाद महाराष्ट्र सरकारच्या राजकरणावर दिसताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना त्या वादात मध्यस्थीची भूमिका घ्यावी लागली. त्यांनी दाखवलेल्या या मोठ्या मनाला बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. आज संध्याकाळी आम्ही कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून उद्या आमच्या पक्षाचा जाहीर मेळावा आहे. त्यानंतर आम्ही उद्या 12 वाजता सगळी आमची भूमिका स्पष्ट करू, असे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी जाहीर केले. (Ravi rana vs Bachchu kadu said that here workers gives orders to leaders maharashtra news marathi nz)

हे ही वाचा  - "माझ्या एका फोनवर बच्चू कडूंनी...", फडणवीसांनी फोडलं गुवाहाटीचं गुपित!

 

पण सोबतच बच्चू कडू यांच्यासाठी कार्यकर्ते आणि जनता महत्वाची आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल. त्यांनी पूढे सांगितले, काय होईल ते आज सांगून कार्यकर्त्याचा अधिकार  मी हिरावून घेणार नाही, कार्यकर्ते जशी भूमिका घेतील त्या पद्धतीने निर्णय घेऊ. प्रश्न कार्यकर्त्यांचा आहे. त्यानुसारच आम्ही समोरचे पाऊल टाकू, कार्यकर्त्यांनी म्हटलं समुद्रात उडी टाक तर आम्ही समुद्रात उडी टाकायला देखील मागे पुढे पाहणार नाही. मी कार्यकर्त्यांना बांधील आहे, हे देखील त्यांनी माध्यमांना सांगितले. काही ठिकाणी नेते कार्यकर्त्याला आदेश देता, पण आमच्याकडे कार्यकर्ता नेत्याला आदेश देतो. 

हे ही वाचा  - गुजरातमध्ये पूल दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकार ही अलर्ट, या पुलाच्या दुरुस्तीचे आदेश

 

राजकरणात कधीच काहीही शांत नसते. आमदार रवि राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर पन्नास खोक्यांच्या अनुषंगाने आरोप केले होते. त्यावर कडू यांनी राणा यांना पुरावे देण्याचे आव्हान दिले होते. पुरावे न दिल्यास अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप वाढत दोघांमधील वाद चिघळला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली होती. उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर रवि राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. बच्चू कडू म्हणाले की, महाराष्ट्रात अशी आचारसंहिता सर्वच नेत्यांना असली पाहिजे, जेणेकरुन कोणीही उट सूट आरोप करणार नाही. 

आज होणाऱ्या बैठकीत सगळा इतिवृत्तांत कार्यकर्त्यांसमोर मांडला जाईल. त्यांची मतं लक्षात घेऊनच पुढील निर्णय लवकरच स्पष्ट करू, असे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.