Shivsagar Lake : साताऱ्याच्या शिवसागर जलाशयात बॅक वॉटर सफर अधिक सुखकर होणार आहे. ग्रामस्थांसह कोयना खोऱ्यात फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता नव्या कोऱ्या तारफा बोटीतून तापोळा ते दरे जलप्रवास करता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्यातील तापोळा ते दरे या गावात घेऊन जाण्यासाठी नवी कोरी तराफा बोट कोयनेच्या शिवसागर जलाशयत सज्ज झाली आहे. ही बोट जिल्हा परिषदेने नव्याने बनवून घेतली असून जुनी बोट सध्या बामनोली येथील धक्यावर लावली आहे. जुन्या बोटीची वयमर्यादा संपली होती. नव्याने दाखल झालेला तरफा जास्त क्षमतेचा आहे.सुमारे 95 प्रवासी बसू शकणार आहेत. याचा वेगही पुर्वीच्या बोटपेक्षा जास्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून नव्याने आलेल्या या बोटीमुळे या परिसरातील लोकांना सध्या मोठा दिलासा मिळाला आहे.


महाबळेश्वर म्हणजे महाराष्ट्राचं मिनी काश्मीर... मुंबईतल्या वरळी वांद्रे सी लिंकप्रमाणं इथल्या शिवसागर जलाशयावर तापोळा ते अहिर असा केबलनं जोडलेला पूल लवकरच बांधण्यात येणाराय... शिवाय निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी काचेची पारदर्शक प्रेक्षागॅलरीही तयार करण्यात येणार आहे. मुंबईतल्या वांद्रे-वरळी सी लिंकच्या धर्तीवर हा नियोजित पूल असणाराय.  वरळी सी लिंक चायनीज तंत्रज्ञानावर आधारित आहे. तर शिवसागर जलाशयावरील नियोजित पूल जर्मन तंत्रज्ञानावर आधारित आहे. हा पूल दोन लेनचा असेल. पुलावर दोन्ही बाजूला दोन मीटर रुंद पदपथ बांधण्यात येणाराय. पाण्यात तीन पिलरवर पूल उभा असेल. मध्यभागी असलेल्या पायलॉनवर ४५ मीटर उंचीवर प्रेक्षकांसाठी गॅलरी बांधण्यात येईल. सुमारे २०० पर्यटकांना एकाच वेळी काचेवर उभे राहून निसर्गाचं विलोभनीय दृश्‍य पाहता येईल. या गॅलरीकडे जाण्यासाठी दोन्ही बाजूला कॅप्सूल लिफ्ट तसंच पाय-यांचीही सोय असेल.