Padmashri Rahibai Popere :  कृषी क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या राहीबाई पोपेरे (Rahibai Popere ) या बीजमाता म्हणून ओळखल्या जातात.  अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई पोपेरे यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील अभिनव कार्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरिवण्यात आले (Padmashri Rahibai Popere). देश पातळीवर ज्यांच्या कार्याची दखल घेतली गेली त्या राहीबाईंचे गाव मात्र, अद्याप रस्त्यांसारख्या मुलभूत सेवा सुविधांपासून वचिंत आहे. रस्तेच व्यवस्थित नसतील तर पद्मश्री होऊन माझा गावाला काय उपयोग? अस संतप्त सवाल उपस्थित करत राहीबाई पोपेरे यांनी थेट सरकारालाच इशारा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशी बियानांचे संवर्धन करणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या कोंभाळणे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुवस्था झाली आहे. रस्ते व्यवस्थित नसतील तर पद्मश्री होऊन माझा गावाला काय उपयोग अशी खंत व्यक्त करत राहीबाई यांनी व्यक्त केली आहे. रस्त्यांच्या मागणीसाठी उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील कोंभाळणे या दुर्गम गावातील राहीबाई पोपेरे यांनी देशी बियाणांसंदर्भात केलेल्या कामामुळे त्यांना विविध पुरस्कारांसह पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. मात्र त्यांच्या कोंभाळणे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांसह अभ्यास दौऱ्यानिमित्त राहीबाईंच्या बिज बँकेला भेट देण्यासाठी येणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.


मेडिकल इमर्जन्सी, शाळा, कॉलेज तसेच इतरही कामांसाठी गावातून बाहेर जाणाऱ्यांना खराब रस्त्यांवरून प्रवास करणे जिकरीचे बनते. यासंदर्भात वारंवार आवाज उठवूनही दखल घेतली जात नसल्याची खंत पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केली आहे. 
रस्ते व्यवस्थित नसतील तर पद्मश्री होऊन माझा गावाला काय उपयोग असा उद्विग्न प्रश्न उपस्थित करत उपोषणाला बसण्याचा इशारा राहीबाईंनी दिला आहे.


कोण आहेत राहीबाई पोपेरे?


अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील कोंभाळणे या दुर्गम गावात राहीबाई पोपेरे राहतात. राहीबाईंनी कधीही शाळेची पायरी देकील चढली नाही. लहानपणापासूनच त्यांना बियाणे जमविण्याचा छंद होता. पारंपरिक पद्धतीने त्या बियाणे गोळा करायच्या आणि शेतात त्याचा वापर करायच्या. 17 पिकांचे 48 प्रकारचे वाण राहीबाईंनी गोळा केले होते. ‘बायफ’ संस्थेचे जितीन साठे यांनी त्यांची भेट घेतली. यानंतर ‘बायफ’च्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे राहीबाईंची बियाण बँक अधिक समृद्ध झाली. राहीबाई  निरक्षर असल्याचा तरी त्यांचा बियाणांच्या बाबतीतील ज्ञानकोश थक्का करणारा आहे.