Badlapur Sexual Assault Case: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे सध्या पोलिस कोठडीत आहे. मात्र, आता अक्षय शिंदेविरोधात आणखी धक्कादायक खुलासे समोर येत आहे. आरोपी अक्षय शिंदे यांनी त्या दोन मुलींव्यतिरिक्त आणखी एका मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपीची ओळख परेड करण्यात आली तेव्हा दोन्हीही चिमुकलींनी आरोपीला ओळखलं आहे. हाच तो काठीवाला दादा, असं म्हणत त्यांनी आरोपीला ओळखलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुरडींवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला होता. शाळेतीलच सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदे या 24 वर्षीय तरुणाने दोघींवर स्वच्छतागृहात लैंगिक अत्याचार केला. मुलींनी पालकांना सांगितल्यावर व त्यांची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर या प्रकरणी पालकांचा संताप अनावर झाला. बदलापूरमध्ये पालकांनी आंदोलन केले. त्यानंतर या प्रकरणी SIT स्थापन करण्यात आली आहे. SITने या प्रकरणी अनेक खुलासे केले आहेत. 


अक्षय शिंदे याची शनिवारी कल्याण कोर्टात पाच पंचांसमोर ओळख परेड घेण्यात आली. रिफ्लेकटेड काळ्या काचेच्या माध्यमातू ओळख परेड घेतली. त्यावेळी आरोपींना दोन्ही चिमुकली दिसणार नाहीत याची काळजी घेण्यात आली होती. तर, चिमुकली आरोपीला पाहू शकत होत्या. दोन्ही चिमुकल्यानी आरोपीला पाहताच हाच तो काठीवाला दादा आहे म्हणून ओळखले आहे. आता या प्रकरणात एसआयटीकडून चार्जशीट दाखल करुन गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात वर्ग करता येणार आहे. 


न्यायालयाने अक्षय शिंदे यांची ओळख परेड करण्याची परवानगी एसआयटीला दिली होती. त्यानुसार शनिवारी अक्षय शिंदे याला तळोजा जेलमधून कल्याण कोर्टात आणण्यात आलं. यानंतर पाच पंचांसमक्ष त्याची ओळख परेड करण्यात आली. हे पंच आणि पिडीत मुली एकमेकांना ओळखत नव्हते या पंच्यांसमोर काठीवाला दादा म्हणत दोन्ही पिडीत मुलींनी अक्षय शिंदे याला ओळखलं. त्यामुळे अक्षय शिंदेच्या गळ्याभोवतीचा फास आता अधिकच घट्ट झाला आहे.


आणखी एका मुलीवर अत्याचार


एसआयटीने तपास सुरू केल्यानंतर अक्षय शिंदेबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. एसआयटीला आधीपासूनच संशय होता की अक्षय शिंदे यांनी आणखी काही चिमुरडींवर अत्याचार केला असावा. त्यानुसार त्यांनी पालकांना सजग केले होते. तसंच, असं काही घडलं असेल तर पुढे येण्याचे अवाहन केलं होतं. त्यानंतर अक्षय शिंदे याने शाळेतीलच आणखी एका चिमुकलीवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटी कडून नराधम अक्षय शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.