चंद्रशेखर भुयार, झी मीडिया बदलापूर : बदलापूरमधल्या (Badlapur) तुलसी विहार या गृहसंकलात राहाणारी तीन वर्षांची अंशिका आपल्या आईसोबत इमातीच्या आवारत रात्री उशीरा खेळायला आली होती. खेळता-खेळता आईची नजर चुकवून अंशिका इमारतीच्या आवारात असलेल्या स्विमिंगपूल (Swimming Pool) शेजारी पोहोचली. अचानक तिचा तोल गेला आणि ती स्विमिंगपूलमध्ये पडली. अंशिका स्विमिंग पूलमध्ये पडल्याची कल्पना तिच्या आईला नव्हती. रात्रीचे साडेअकरा वाजले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याच सुमारास इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहणारी निधी उमरानिया ही तरुणी आपल्या बाल्कनीत उभी होती. अंशिका स्विमिंग पूलमध्ये पडल्याचं तीने पाहिलं आणि तात्काळ तीने आपल्या वडिलांना या बाबत माहिती दिली. वेळ न दवडता ती इमारतीच्या पायऱ्यांवरुन धावत खाली पोहोचलली. खाली पोहोचतात निधीने थेट स्विमिंग पूलमध्ये उडी मारली आणि अंशिकाला बाहेर काढलं. नाका तोंडात पाणी गेल्याने बेशुद्ध पडली होती. निधीने अंशिकाचं पोट दाबून तिच्या पोटातलं पाणी आधी बाहेर काझलं. पण यानंतरही अंशिकाची हालचाल होत नसल्याने निधीने अंशिकाला तोंडाद्वारे श्वासोश्वास दिला. त्यानंतर अंशिकाने हालचाल केली.


तोपर्यंत इमारतीतील इतर रहिवासीदेखील जमा झाले होते. अंशिकाला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. निधीने दाखलेल्या धाडसाने अंशिकाचे प्राण वाचले असून तिचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. 


स्विमिंग पूलमध्ये पडून जुळ्यांपैकी एकाचा मृत्यू
काही महिन्यांपुर्वी लोणावळ्यात एक दुर्देवी घटना घडली होती. जुळ्या मुलांचे वाढदिवस साजरा करण्यासाठी एक कुटुंब लोणावळ्यातील एका हॉटेलवर आलं होतं. पण दुर्देवाने वाढदिवसाच्याच दिवशी जुळ्या मुलांपैकी एका मुलाचा हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला. मृत मुलगा हा अवघ्या दोन वर्षांचा होता. 


अखिल पवार हे आपल्या दोन वर्षांच्या जुळ्या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्यातील तुंगार्ली इथल्या एका हॉटेलमध्ये आले होते. हॉटेलमध्ये मुलांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी करण्यात कुटुंबिय जमलं होतं. त्याचवेळी जुळ्या मुलांपैकी एका मुलगा खेळता-खेळता बाहेर आला आणि स्विमिंगपुलमध्ये पडला. मुलगा कुठे दिसत नसल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली. शोध घेत असताना मुलगा पाण्यात बुडल्याचं लक्षात आलं, त्याला पटकण बाहेर काढण्यात आलं पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.


अशा घटना टाळण्यासाठी घरात किंवा आपल्याबरोबर लहान मुलं असतील तर डोळ्यात तेल घालून त्यांच्यावर लक्ष ठेवा. तुमची एक चूकही त्यांच्या जीवावर बेतू शकते.