Bageshwar Dham : आपल्या वक्तव्यांनी सातत्याने चर्चेत असणाऱ्या बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री (dhirendra krishna shastri) यांनी पुन्हा एकदा एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिल्यानंतर धीरेंद्र शास्त्री यांच्या नावाची महाराष्ट्रात भरपूर चर्चा झाली होती. दिल्यानंतर धीरेंद्र शास्त्री यांच्या नावाची महाराष्ट्रात भरपूर चर्चा झाली होती. काही दिवसांपूर्वी धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या कथित चमत्कारावर वाद सुरू असतानाच त्यांनी संत तुकाराम महाराज (sant tukaram maharaj) यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिर्डीच्या (Shirdi) साईबाबांविषयी (Sai Baba) वादग्रस्त वक्तव्य केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 जबलपूरच्या पनगर येथे श्रीमद भागवत कथेच्या शेवटच्या दिवशी लोकांशी संवाद साधताना पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना साईबाबांबद्दल भाष्य केले. "आमच्या धर्मातील शंकराचार्यांनी साईबाबांना देवतांचे स्थान दिलेले नाही आणि शंकराचार्यांनी सांगितलेली गोष्ट पाळणे हा प्रत्येक सनातनीचा धर्म आहे. कारण ते आपल्या धर्माचे प्रमुख आहेत.  कोणताही संत, मग तो गोस्वामी तुलसीदास जी असो वा सूरदास जी, तो संत, महापुरुष, युगपुरुष, युगपुरुष असतो. पण देव नसतो. लोक यावरुन वाद घालतील, पण हे सांगणेही अत्यंत गरजेचे आहे की, कोल्ह्याची कातडी घालून कोणीही सिंह बनू शकत नाही," असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले.


हे ही वाचा : पतीने  बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात नेले नाही म्हणून महिलेने स्वतःला संपवलं


दुसरीकडे, शंकराचार्यांनी साईबाबांना देव मानण्यास नकार दिला. त्यांनी साईबाबांच्या पूजेला चुकीचे म्हटले होते. तसेच साईबाबांच्या मंदिराच्या उभारणीलाही विरोध केला. साईबाबा हे पूजनीय देव नाहीत, असेही शंकराचार्य म्हणले होते.


जेव्हा पंडित धीरेंद्र शास्त्री यांना विचारण्यात आले की साईबाबांची पूजा करावी की नाही? मग त्यांनी उत्तर दिले. "आम्हाला कोणाच्याही विश्वासाला धक्का लावायचा नाही. पण एवढं जरुर सांगू शकतो की, साईबाबा हे संत किंवा फकीर असू शकतात पण देव असू शकत नाही. तिथे हिंदू पद्धतीने पूजा होत असली तरी कोल्ह्याची कातडी घालून कोणीही सिंह बनू शकत नाही (गीदड़ की खाल पहन कर कोई शेर नहीं बन सकता),"  असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले.


संत तुकाराम महाराजांविषयी काय म्हणाले?


संत तुकाराम महाराज यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची, असा दावा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केला होता. "संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील एक महात्मा आहेत. त्यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची. याच कारणामुळे त्यांना एका व्यक्तीने विचारले की तुमची पत्नी तुम्हाला रोज मारहाण करते, मग तुम्हाला वाईट वाटत नाही का? या प्रश्नाचे संत तुकाराम महाराजांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, देवाची कृपा आहे की मला मारहाण करणारी पत्नी भेटली. मला प्रेम करणारी पत्नी भेटली असती, तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. मी पत्नीच्याच प्रेमात गुरफटून गेलो असतो. मला मारहाण करणारी बायको मिळाली आहे, त्यामुळे मला प्रभू राम यांची भक्ती करण्याची संधी मिळते, असे संत तुकाराम महाराज म्हणाले होते," असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले होते.