सांगली : कोरेगाव भीमामध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे पडसाद आजही राज्याच्या वेगवेगळ्या भागात बघायला मिळतं आहेत. आज सांगलीत बहुजन संघटनांच्या मोर्चाला सुरूवात झालीय. विश्रामबागेतल्या क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली.


कोरेगाव भीमा प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी काल सांगली पोलीसांनी शहरात संचलन करून शांततेचं आवाहन केलं. कोरेगाव भीमा प्रकरणातील दोषींवर लवकर कारवाई करावी या मागणीसाठी आज सांगली मध्ये बहुजन संघटनांचा मोर्चा काढला आहे. विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्या पासून ह्या मोर्चाला सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. 


संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा


सांगलीचे रहिवासी असणारे संभाजी भिडे यांच्यावर याप्रकरणी चिथावणीखोर भाषणं दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यानंतर भिडेंच्या समर्थनार्थ सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला होता.