नाशिक : नाशिकच्या म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कला नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्री साडे दहा वाजल्याच्या सुमारास निखिल उर्फ बाळा मोरे या सराईत गुन्हेगाराचा खून झालाय. अज्ञात टोळक्याने धारधार शस्त्रांनी वार करून गोळीबार केल्याची परिसरात चर्चा आहे.


आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झालीयत. मात्र, अद्याप पोलिसांचे हात रिकामे आहेत. 


आठ दिवसापूर्वीच पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे एका सराईत गुन्हेगाराचा टोळक्याच्या मारहाणीनंतर उपचार दरम्यान मृत्यू झाला होता. गेल्या अनेक दिववसांपासून शहरात भर रस्त्यात खुनाच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत आहे.