कोल्हापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे शिवाजीपार्क येथील भाषण भाजप नेत्यांना भावले आहे तर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना झोंबले आहे. त्यामुळे एकीकडे राज ठाकरे यांची पाठराखण करण्यासाठी भाजप नेते पुढे सरसावत आहेत. तर, आघाडी सरकारमधील नेते टीका करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राज ठाकरे यांची स्तुती केलीय. तुम्ही खुर्चीला चिकटून बसला आहात असं आम्ही एकटे म्हणत होतो, पण आता आणखी एक जण बोलत आहे. सामान्य हिंदूंना अभिमान वाटावा असे राज ठाकरे यांचे भाषण होते. प्रत्येकाला हिंदू आहोत याचा गर्व वाटला पाहिजे. 'हिंदू' या शब्दात सर्वधर्म समभाव आहे, असे ते म्हणाले.


मुसलमान यांना जसा धर्म आहे, तसा हिंदूंनादेखील धर्म आहे हिंदूंनी कधीही मस्जिदीवर हल्ला केला नाही. पण, मुसलमान यांनी मंदिरे पाडली हा इतिहास आहे. काल राज ठाकरे जे बोलले त्यात कुणाचे लांगुलचालन नव्हते. त्यामुळे राज ठाकरे यांचे भाषण ऐकलं आणि मला बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची आठवण झाली, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.